Wednesday, October 26, 2016

दिवाळी २०१६ च्या निमिताने


४ वर्षांपुर्वी.. अशी फेसबुकनी आठवण करून दिली आणि mobile मधे download करून ठेवलेलं कालनिर्णय- मराठी app check केलं तेव्हा दिवाळी जवळ आल्याची जाणीव झाली. लहानपणी बाहेर बाबांनी आकाशकंदील लावला की आणि नंतर तुपा- तळणीचे वास अभ्यासाच्या खोलीत शिरले की दिवाळीची चाहूल लागायची.
मग अचानक तहान नेहेमी पेक्षा जास्त वेळा लागायची. त्यामुळे आपसूकच फराळाची तयारी कुठवर आलेली आहे हे समजायचं. एकदा का देवाला नैवेद्य दाखवताना दरवर्षी असाच पुढयात असलेला पदार्थ भरपूर मिळू दे असं म्हणून झालं की आमचा दिवाळी पहाटेचा फराळ त्या दिवशी पासूनच चालू व्हायचा आणि मग खरच तहान तहान चालू व्हायची .
आजीने शिवलेला प्रत्येक दिवसाचा एक याप्रमाणे निदान ३-४ फ्रॉक घालण्याची पर्वणी संपली तरी ४ दिवस उगाचच नवीन कपडे घालून बसायचं. भारी वाटत म्हणून. प्रत्येक दिवशी एक अशी ४ ही दिवस रांगोळी काढून घरासमोरची फरशी भरली जायची. शिंगं फुटल्यापासून मात्र लहर आली तरच एखादी छान रांगोळी काढून तीच ४-५ दिवस जपली जायची.
फटाके वगैरे लहानपणी भरपूर उडवले. फुलबाज्या ते सुतळी बॉम्ब पर्यंतची मजल गाठली आणि तोपर्यंत पैसे आणि पर्यावरण ची झीज असे विषय समजायला लागले आणि फटाक्यांची दिवाळी संपली. पणत्यांची आरास मात्र तेलाचे भाव कितीही वाढले तरी मनावर न घेता घरातल्या एकूण एक पणत्या माळ्यावरून काढून केली जायची. दारावरचं तोरण हा section माझ्याकडून कधी आणि कोणाकडे transfer झाला ह्याची फारशी कल्पना मला नाही.
पाडवा आणि भाऊबीजेला मिळणा-या gifts बद्दल generally मुलींना जेव्हढी excitement असते तेव्हढी मला वाटली नाही पण mic, carrom board, cycle , computer सारख्या life changing गोष्टी गरजेनुसार न मागता मिळायच्या .
माझा आवडता सण असा विषय येता, सरधोपट पणे बाईंनी लिहून दिलेला दिवाळी वरचा निबंध आणि आज जे लिहिते आहे ते पाहून जाणवलं, आपण अनेक दिवाळ्या पहिल्या आहेत असं ठामे ठोक पणे सांगू शकतो :p . प्रत्येक वर्षी गोष्टी सगळ्या त्याच तरीही प्रत्येक वर्षीची दिवाळी वेगळी वाटते. असं माझ दिवाळी पुराण ऐकून घेतल्यावर प्रीतमनी "ह्या आठवड्यात दिवाळीत दिवाळं निघणार आहे आमचं office मधे", अशी cliche कोटी करत द्यायची ती कल्पना आधीच दिलीये. बघू ह्या वर्षी कशी होतेय आमची दिवाळी ते.
ताजा कलम : घरून दिवाळी चा खाऊ येणार आहे. #excited . ते मिळण्या आधीच आईने indirectly पुढच्या वर्षीपासून स्वतः घरी फराळ करायचा असं सुचवलेलं आहे #huh -_-
D
Disclaimer: मी फराळ करण्यात आणि दिवाळीची साफसफाई करण्यात मदत करायचे का वगैरे प्रश्न कृपया विचारू नयेत. 

दिवाळीच्या काही निवडक आठवणी :  


ह्यावर्षी रांगोळी काढण्याचया मूड नव्हता म्हणून फक्त pose: