Tuesday, April 9, 2019

Skincare part - 7
सौंदर्यप्रसाधने वापरण्याचा क्रम
Clean, Scrub आणि tone ह्या तीन स्टेप्स मध्ये कोणाला फार काही शंका नसावीच. गोंधळ चालू होतो तो क्रीम्स वापरण्याच्या क्रमात. एकावर एक क्रीम लावताना कोणतं आधी आणि कोणतं नंतर हे आपल्यलाला पटकन ठरवता येत नाही. आपण समोर जे हाताला आधी येईल ते उचलून लावायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे म्हणावं तसं effeiciently product वापरलं जात नाही. खाली दिलेल्या फोटोत मॉर्निंग आणि नाईट रुटीन ची ideal order दिलेली आहे. त्यापाठीमागचं लॉजिक असं - जी क्रीम्स पातळ ती आधी. आणि जसजशी त्याची जाडी वाढते तसतशी ती नंतर. तर कधी हा क्रम लक्षात जरी राहिला नाही तरी क्रीम हातावर घेऊन आपण त्याचा क्रम गोंधळून ना जाता स्वतः ठरवू शकतो. मी दिलेल्या essentials मध्ये आपल्याला फक्त mositurizer आणि suncreen मधलाचं क्रम ठरवायचा होता. तरीही मी अधिक माहिती साठी संपूर्ण क्रम दिलेला आहे. मी ह्या यादीतील Antioxident cream, eye cream, night repair serum अशी Estee Lauder ह्या महागड्या ब्रँड ची products केवळ मला free samples मिळाली म्हणून वापरते. परिणाम नक्कीच चांगला आहे. एकावर एक क्रीम लावण्याआधी ideally निदान ५-१० मिनिट्स एक क्रीम मुरायला वेळ देऊन मग दुसरं लावणं गरजेचं आहे. पण आपल्या घाई गडबडीचा वेळापत्रकात किमान १ मिनिट देता आला तरी उत्तम. मला घाई असते तेव्हा मी कधीतरी हा एक मिनिटे सुद्धा देऊ शकत नाही.


Skincare part 6
*Sunscreen*
©कलिका वैशंपायन
Another important step.
बाहेर आज ढगाळ वातावरण आहे किंवा सावली सावलीतूनच तर फिरणार मी सगळीकडे. मी चेहरा पूर्ण scarf नी झाकते. अशा सबबी देऊन आपण sunscreen टाळतो. घराबाहेर पडत असाल तर exposed त्वचेला sunscreen लावले गेलेच पाहिजे. Sunscreen मध्ये preventive factors सोबतच corrective formula सुद्धा असतो त्यामुळे काहीजण तर दिवसा घरात असलात तरी sunscreen लावण्याचा सल्ला देतात. असं केलंत तर उत्तमच. पण at least बाहेर पडताना जरूर लावावं.
Sunscreen बद्दल माझ्या मामीशी बोलताना तिने ह्या बद्दल एकदम apt प्रश्न विचारला, "Sunscreen ही essensial steps मध्ये आणण्याच्या सल्ल्यात नेमकं तथ्य किती आणि marketing gimmick किती?" खरं सांगायचं तर ह्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपण स्वतः प्रयोग करून पाहात नाही तोपर्यंत ठोस काही सांगण्यात अर्थ नाही.आपले स्वतःबद्दलचे न्यूनगंड, आपल्या स्वतःची चांगले दिसण्याची डोक्यातील प्रतिमा, लोकांच्या डोक्यातील आपल्या दिसण्याकडून असलेल्या अपेक्षा अशा अनेक negative विचारांना target करून skincare आणि makeup ह्या विषयाचं market आपली पाळंमुळं रोवून उभं आहे. त्यामुळे त्याच्या credibility वर प्रश्नचिन्ह उभं राहणं साहजिकच. मार्केट मध्ये आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या निरनिराळ्या प्रकारची products दिमाखात shelfs मध्ये नांदत असतात. त्यातून कोणत्या गोष्टींना नेमकं प्राधान्य द्यायचं हे sort out करणं हे अवघडंच. मी ज्या Clenase, Scrub, Tone, Moisturizer आणि Suncreen अशा crucial steps म्हणते आहे हे अनेक articles वाचून विचारपूर्वक निवडलेल्या गोष्टी.
आजकाल प्रत्येक skincare expert, sunsreen वापरण्याच्या सल्ल्यावर विशेष भर देताना दिसतो. सूर्याची किरणं कलुषित झाल्यामुळे आपल्या त्वचेवर अनिष्ट परिणाम झालेले त्यांना आढळतात. शिवाय त्वचा कमी काळवंडते आणि त्वचेला सुरकुत्या पडणं लांबवलं जाऊ शकतं असे sunscreen वापरण्याचे छोट्या level वरचे फायदे. Credibility वर प्रश्नचिन्ह उभा करून नंतर anti-ageing creams लावण्यापेक्षा sunscreen लावलेलं बरं, असा माझा विचार. शेवटी ही सुद्धा एक प्रकारची भीतीच. पण आजकाल त्वचेचं aging फार कमी वयात होतंय ही ओरड आहेच. Aging होणं ही नैसर्गिकच आहे पण आजकाल काळजी न घेतलेलं aging फार काही रेखीव दिसत नाही हेही तेवढंच खरं. म्हणून म्हणते prevention is better than cure. नाही का?
तर आता तुम्ही sunscreen च्या favour मध्ये असाल तर sunscreen म्हणजे नेमके काय आणि कसे निवडावे ह्याबद्दल. Sunscreen लावल्यानी आपल्या त्वचेचे सूर्यकिरणांमधल्या UV radiation पासून संरक्षण होते. हे संरक्षण किती प्रमाणात होईल ह्याचे प्रमाण SPF (Sun Protection Factor) नी दर्शवले जाते. जेवढा नंबर मोठा तेवढं सरंक्षण जास्त. भारतासारख्या प्रखर ऊन असलेल्या देशांत ज्या sunscreen मध्ये SPF किमान ३० किंवा ३० पेक्षा जास्त असते, असे suncreen सर्वांनीच निवडावे. (बाटलीवर छापलेले असते)
तेलकट आणि acne prone त्वचा असलेल्यांनीं gel based products वापरावीत. Moisturizing base असलेली products, normal आणि dry त्वचाअसलेल्यांनी वापरावीत. आणि ह्या नियमाचे पालन अगदी काटेकोरपणे करावे. अन्यथा अनिष्ट परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात. - स्वानुभव.
Sunscreen लावण्याची actually एक special process आहे. हे घरातून बाहेर पडण्याआधी अर्धा तास लावावे. शिवाय आपल्याकडे येणाऱ्या घामामुळे हे cream, ideally दर दोन तासांनी लावावे असं म्हणतात. आपण perfection चं ओझं न बाळगता दिवसात बाहेर पडण्याआधी एकदा जरी लावले तरी पुष्कळ आहे. आणि मन लावून जर ideal process follow केली तर सोने पे सुहागा.
©कलिका वैशंपायन
Skincare part 5
*Moisturizer*
©कलिका वैशंपायन
त्वचेचा मुलायमपणा टिकवण्यासाठी म्हणून आपल्याकडे moisturizers च्या जाहिराती थंडीच्या सुरुवातीला चालू होतात आणि थंडी संपत आली की कमी कमी होत जातात. त्यामुळे beauty illiteracy असलेल्या आपल्या घरात moisturizer चा उदय आणि अस्त थंडीतच होतो. काही जण तर थंडीतही त्वचा जोपर्यंत कोरडी पडत नाही तोपर्यंत थंडीतही वापरत नाहीत. ह्या category मध्ये मी यायचे. आणि अधून मधून येते सुद्धा.
तर ओघानी समजलंच असेल की, moisturizer ही महत्वाची पायरी आहे आणि ती seasonal न राहता routine मध्ये आली पाहिजे. भरपूर पाणी पिऊन स्वतःला hydrate करणे आणि moisturizer लावून बाहेरून oiling करणे हा त्वचेची निगा राखण्याचा उत्तम मार्ग आहे.
चेहऱ्यासाठी बाजारात कमी तेलकट दिसणारी आणि लावल्यानंतर कमी उकडणारी वेगळी moisturizers मिळतात. Acne, तेलकट किंवा sensitive त्वचा असलेल्यांसाठी वेगळी products मिळतात तीच कटाक्षाने वापरा. नाहीतर अनावश्यक तेल त्वचेत गेल्याने acne संभवू शकतो. इतर अंगासाठी बाजारात मोठमोठ्या बाटल्या विकत मिळतात त्या वापराव्यात.
Moisturizer सकाळ संध्याकाळ लावावे आणि त्वचा कोरडी जाणवल्यास अधे-मधे लावले तरी चालेल. Moisturizer लावताना त्वचा थोडीशी moist असणं गरजेचं आहे. ह्यासाठी अंघोळ झाल्यावर लगेच किंवा संध्याकाळी आधी हातापायाला पाणी लावून, पुसून लावता येईल अंघोळ झाल्यावर लगेच किंवा संध्याकाळी हातापायाला पाणी लावून, पुसून लावणे योग्य. कोरड्या त्वचेवर direct moisturizer लावल्यास त्वचा तडकल्यासारखी होते. त्यामुळे moisturizer रोज लावून सुद्धा म्हणावा तसा परिणाम मिळत नाही. Moisturizer लावायची ही trick मी स्वतः आजमावून पाहिली आणि फरक पडलेला दिसला.
घरगुती, कमी किंमतीत आणि easily available असलेले options म्हणजे दुधाची साय, तूप, कोकम तेल. ह्याच्या वास आणि texture मुळे हे दिवसा लावण्यायोग्य नाहीत. त्यामुळे रात्री झोपताना लावावे.
ओठांसाठी बाजरातले lip balm किंवा घरात असलेले तूप लावावे. स्वानुभवावरून - Lip balm जास्त वेळ टिकते. तूप पटकन जीभ फिरवून खाल्ले जाते. शिवाय तूप खिशात किंवा पर्समध्ये बाळगणे जरा जिकिरीचेच.
तर हाताला त्वचा कोरडी लागत नाही म्हणजे तुम्हाला moisturizer ची गरज नाही, असे नाही. काय?
© कलिका वैशंपायन
Skincare part 4
*Toner*
©️कलिका वैशंपायन
*MUST* 
Cleansing आणि scrubbing मुळे आपल्या त्वचेची रंध्रे (pores) प्रसरण पावून धुळीचा नायनाट होतो. पण त्यांना पुर्ववत स्थितीत आणलं नाही तर धुळीचे कण त्यात साचून blackheads/ pimples होऊ शकतात किंवा simply त्वचा विचित्र दिसायला लागते. टोनर लावल्यानी त्या रंध्रांना आराम मिळतो व ती आकुंचन पावून पूर्ववत होतात.
Toner प्रत्येक वेळी चेहरा धुतला गेल्यावर लावला गेलाच पाहिजे. त्याचा instant परिणाम दिसला नाही तरी long run मध्ये ही सवय नक्कीच फायद्याची ठरते.
बाजारात variety of toners मिळतात. त्यातला सगळ्यात easy to find टोनर म्हणजे गुलाबपाणी. बाकी घरच्या घरी बनवता येणारे options google war मिळतीलच.
टोनर संपूर्ण अंगाला वापरला नाही तरी हरकत नाही. पण चेहरा आणि मान ह्यासाठी मात्र MUST आहे.
ता. क. - टोनर वर कमी लिहिलं गेलं असलं तरीही त्याचा उपयोग असामान्य आहे. कृपया ह्याला कमी लेखू नका.
©️*कलिका वैशंपायन*
Skincare part ३
Scrubbing
©कलिका वैशंपायन
Cleansing नंतर दुसरी step आहे scrubbing. आपल्या शरीरावरची गुळगुळीत साबणामुळे न जाणारी घाण आणि मृतपेशी शरीरावरुन सारण्यासाठी आवश्यक.
ह्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे खरखरीत टॉवेलनी अंग पुसणे. दुसरा मार्ग म्हणजे shower gel आणि loofah.हे एक सुगंधी आणि सोपे tool आहे. खरखरीत आयुर्वेदिक लेप, उटणे किंवा केसांना लावतो ती शिकेकाई पावडर आपण बॉडी साठी वापरू शकतो. ह्याशिवाय स्वयंपाक घरात सापडणाऱ्या अनेक गोष्टी scrub म्हणून वापरू शकतो. ह्याची माहिती 'home made natural scrubs' असे google केल्यास मिळू शकेल.
Scrubbing करताना पायाची पाऊलं, तळपाय आणि विशेष करून टाचा ह्या भागांकडे लक्ष द्यावे. अंघोळ झाल्यावर त्वचा ओलसर असताना ह्या भागासाठी खरखरीत पांढरा दगड किंवा pedicure करण्याचे जे छोटेसे टूल बाजारात मिळते ते वापरावे. पायांच्या नखांच्या आतल्या कडेनी अंग पुसण्याचा खरखरीत टॉवेल बोटांनी फिरवावा. असे केल्यानी pedicure करण्याची फार गरज भासत नाही.
चेहऱ्यासाठी घरगुती किंवा ready made scrub हा प्रत्येकाच्या गरजेनुसार करावा. काहींना रोज करण्याची गरज असते. काहींना एक दिवस आड तर काहींना आठवड्यातून २ वेळेला पुरेसे आहे. चेहऱ्याला scrub करताना जीव काढून घासू नये. चेहऱ्यासाठी बाजारात सौम्य scrubs मिळतात ते वापरू शकता.
चेहेऱ्याच्या scrubbing मुळे आजकाल बऱ्याच जणांना भेडसावणारा blackheads आणि white heads चा त्रास कमी होतो आणि त्वचेला लकाकी (shine) येते. मात्र चेहरा clean आणि scrub केल्यानंतर चेहऱ्याला toner लावणे MUST आहे. त्याबद्दल पुढील भागात.
©कलिका वैशंपायन
Skincare Part 2
Cleansing
©कलिका वैशंपायन
छोटासा प्रयोग करा. घराच्या खिडकीत सकाळी एक पांढरा शुभ्र कागद ठेवून द्या. संध्याकाळी त्या कागदावरुन बोट फिरवा. तेवढी धूळ तुमच्या शरीरावर आहे हे समजून जा. ही दूर करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आंघोळ करणे अत्यावश्यक आहे. शिवाय मधल्या वेळेला दुपारी किंवा संध्याकाळी फेस वॉशने चेहरा धुणे तितकेच महत्वाचे आहे. घरा बाहेर पडणाऱ्यांनी ऑफिस मध्ये गेल्या गेल्या चेहरा धुवून काम करायला सुरुवात केली तर बेस्ट. जेणेकरून आपली त्वचा मोकळा श्वास घेऊ शकेल.
आपल्या चेहऱ्याची त्वचा इतर अंगावरील त्वचेपेक्षा नाजूक असते. त्यामुळे अंघोळीला साबण वापरताना चेहऱ्याचा, केसांचा साबण इतर अंगाच्या साबणापेक्षा वेगवेगळा असावा. बाजार सध्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साबणांनी गजबजून गेलेला आहे. हे चांगलं देखील आहे आणि बऱ्याचदा confusing. त्यामुळे साबण निवडताना ते आपल्या skin type ला suitable आहेत की नाही हे तपासून मगच विकत घ्यावेत.
फक्त साबणच नाही तर overall cosmetics निवडताना त्या प्रॉडक्ट ची quality ही त्याच्या किमतीवरून किंवा brand name वरून ठरवता येत नाही. एखाद्याला ज्याचा परिणाम साधता आला तो दुसऱ्याला मिळेलच असं नाही. त्यामुळे एखादी गोष्ट विकत घेऊन, ती वापरूनच long run मध्ये वापरायची की नाही हे ठरवता येते. त्यासाठी प्रयोगादाखल त्या प्रॉडक्ट ची सर्वात छोटी बाटली /sachet /pouch विकत घ्यावा. किंवा कोणी आपल्या ओळखीतील, एखादं प्रॉडक्ट वापरत असतील तर ते वापरून पाहावे. म्हणजे खिशाला कात्री लागत नाही.
©कलिका वैशंपायन
Skincare Part-1
*सौंदर्य आणि आपण*
©कलिका वैशंपायन
आपल्याकडे शरीराच्या स्वच्छतेबद्दल जेवढे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते तेवढेच दुर्लक्ष त्याच्या सौंदर्याकडे केले जाते. माणूस जेवढा स्वच्छतेमुळे टापटीप दिसतो तेवढाच त्याच्या घेतलेल्या काळजीमुळे प्रसन्न, आकर्षक आणि चारचौघांमध्ये उठून दिसतो. काही वेळा असंही होतं की, एखाद्या माणसानी विशेष घेतलेली काळजी डोळ्यात भरत नसली तरीही अशा प्रकारच्या केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे त्या माणसाचा आत्मविश्वास मात्र लखलखत असतो .
योग्य आहार, झोप, शरीर स्वच्छता जेवढी महत्वाची आहे तेवढेच आपल्या बाह्यरूपाला खुलवण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. बाह्यरूप म्हणजे नेमकं काय? तर केस, त्वचा, दात आणि नखे. दात आणि नखे कशी असावीत हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहेच. पण आपल्या केसांची आणि त्वचेची देखील स्वच्छतेपलीकडे जाऊन काळजी घेणं गरजेचं असतं. झाडांना जसं योग्य जमीन, पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला की फुलाफळांनी ते बहरून जातं तशीच आपल्या त्वचेला दैनंदिन आयुष्यात योग्य आहार, झोप आणि बाह्य मशागतीची गरज असते. शरीर स्वच्छता ही बाह्य मशागतीचा केवळ एक भाग आहे. आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचं द्योतक आहे. कदाचित आत्ता तुम्ही काही विशेष काळजी न घेताही छान दिसत असाल पण जसजसं वय पुढे सरकायला लागतं तशी त्वचा वयाच्या मानानी लवकर थकलेली दिसायला लागते.
मेकअप क्षेत्रात काम करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की जसा चित्र काढण्या आणि रंगवण्यासाठी पांढराशुभ्र सुंदर कागद असला पाहिजे तसा मेकअप सुंदर दिसण्यासाठी त्याचा कॅनवास स्वच्छ, सुंदर आणि नितळ असला पाहिजे. एका वेळी लावलेल्या base नी मी माझं काम सोप्प करते पण मेकअप करूनसुद्धा, म्हणावा तसा तो आकर्षक वाटत नाही. तेव्हा मेकअप करून घेणाऱ्याच्या थोड्याश्या मेहनतीची गरज आहे हे लक्षात येतं.
मुळात आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या बाह्यरूपासाठी थोडा वेळ काढणं, हे एवढं अवघड का वाटतं? थोडासा विचार आणि निरीक्षणं करता माझ्या समोर आलेली कारणं -
१. विचारसरणी:-
a. स्वतःला अशा प्रकारचा वेळ देणे म्हणजे गुन्हा किंवा नटवेपणाचे वाटणे /लाज वाटणे/ वाया गेलो असे वाटणे.
b. सौंदर्य हा विषय आपल्यासाठी नाही हे ठरवून टाकणे - ह्या कॅटेगरीत maximum पुरुष येतात. काही प्रमाणात मुली आणि विशेष करून मोठ्या वयाच्या बायका. ह्यांच्याकडून नेहेमी ऐकलेलं वाक्य म्हणजे "आम्ही जेव्हा आमचं वय होतं तेव्हा नाही केलं काही असलं, तर आता काय करणार?"
c. सौंदर्य तुच्छ आहे. असा समज असणे.
d. सौंदर्य टिकवण्याचे प्रयत्न हे तारुण्य टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न. असा समज असणे.
२. विषयाबद्दलची माहिती नसणे.
३. विषयाबद्दलची माहिती असली तरी सुरुवात कुठून करावी ह्याबद्दल संभ्रम असणे.
४. सौंदर्य खुलवणे हे खर्चिक प्रकरण आहे. असा समज असणे.
५. कंटाळा
खरं तर ही अशा प्रकारची मते ऐकतच मी मोठी झालेली आहे. तेव्हा काही प्रश्न पडतात.
कपडे आपण फक्त धुवून घालू शकतोच की! पण कॉटन चे असतील तर त्याला स्टार्च करतो. सुरकुतले असतील तर इस्त्री करतो . घरी धुता येणारं नसतील तर dry cleaning ला देतो. एवढा वेळ आणि उटारेटा कशासाठी? स्वच्छतेपलीकडेही शोभून दिसावं म्हणूनच ना?
शाळेत, वाचण्यायोग्य हस्ताक्षर असलं तरीही मोत्यासारख्या सुंदर हस्ताक्षराला तसेच प्रोजेक्ट्सना सुशोभीकरणाचे extra marks कशासाठी?
घर साधी झाडपूस करून पण राहण्यायोग्य होतंच. पण तरीही आपण interior decoration करतो किंवा घरात इतर अनेक गोष्टी मांडून घर सुशोभित करतो. एवढंच कशाला! आपण घराच्या आत राहतो, तर बाहेरून कशाला ते चांगलं दिसायला हवं? पण करतो आपण खर्च- पैसे आणि वेळ.
मग स्वतःच्या शरीरानी काय घोडं मारलाय आपलं?
सौंदर्याला अनाठायी महत्व द्यावं ह्या मताची मीही नाही. ब्युटी आणि बुद्धी ह्यात स्पर्धा लावली तर कायम बुद्धीच जिंकेल पण म्हणून ब्युटी चा तिरस्कार करावा किंवा दुर्लक्ष करावं असंही मला वाटत नाही. सध्या हाती आलेल्या नवीन विषयामुळे ह्या नवीन जगात डोकावले तेव्हा विषयाची योग्य जाण असलेले तसेच अवडंबर माजवणारे अनेक लोक दिसले आणि भेटले. आपल्या स्वतःच्या दिसण्याचा आणि आत्मविश्वासाचा फार जवळचा संबंध मला कायम जाणवला.(exceptions आहेतच) आपल्यासारख्या बुद्धिजीवी माणसांनी ह्या विषयाचं महत्व समजावून घेऊन नेमकं कुठे थांबायचं हे एकदा ओळखलं तर... फतेह!!
तर गोष्ट एकदम साधी सोपी - Clean, Scrub, Tone, moisturize आणि sunscreen.
Disclaimer - १. मी काही त्वचा तज्ज्ञ नाही. मी लिहिणार असलेल्या लेख मालिकेचा उद्देश हा केवळ suggestive समजावा.
२. सौंदर्य ही फक्त स्त्रियांची मक्तेदारी नाही. बाह्यरूप पुरुषांनाही असते. त्याची काळजी घेणे पुरुषांनासुद्धा आवश्यकच आहे. कृपया लिखाणात कुठे स्त्रीलिंगी, व्यक्ती, माणूस ह्या प्रकारचा उल्लेख आढळल्यास तिथे स्त्री व पुरुष दोघांचाही उल्लेख समजावा.
ता. क. :- हा लेख सर्व वयोगटातील स्त्रिया व पुरुष ह्यांना उद्देशून आहे. त्यामुळे आज पर्यंत केलं नाही/ करता आलं नाही अशी स्वतःला कारणं देऊ नका. आज तुम्ही वयाच्या कोणत्याही stage ला असाल तिथून आरामात सुरुवात करू शकता. दिवसातली ५-१५ मिनिट्स ह्या गोष्टी साठी काढलेला वेळ म्हणजे स्वतःला दिलेलं महत्व होय. शेवटी वयाच्या कोणत्याही stage ला असताना एखाद्याने आपल्या वयाबद्दल कॉम्प्लिमेंट दिली, तर वरवर कितीही दाखवलं नाही, तरी मनोमन सुखावल्या सारखं वाटतंच ना !
©कलिका वैशंपायन